मोल्सवर्थ आणि त्यांच्या हाताखालच्या सात संस्कृत-मराठी शास्त्रींनी संपादित केलेल्या शब्दकोशातला ‘ट्याहां’ आतापर्यंत किती लोकांनी अचूक लिहिला असेल?

१३ जुलै २०२१ रोजी जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५०वी पुण्यतिथी साजरी झाली. त्यांना महाराष्ट्रात ‘मोलेसरशास्त्री’ किंवा ‘मोरेश्वरशास्त्री’ या नावानेही ओळखले जाते. १८५७मध्ये मोल्सवर्थ आणि त्यांच्या हाताखालच्या सात संस्कृत-मराठी शास्त्रींनी संपादित केलेल्या शब्दकोशातल्या ६०,००० हून जास्त शब्दांमध्ये ‘ट्याहां’ हा शब्द आहे. तो मुंबईतल्या ३०६ बाळांच्या निमित्ताने एकाच दिवशी असंख्य वाचकांनी पुन्हा एकदा वाचला.......